महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडून कासारे गावातील शेतकर्यांना कृषि साहित्याचे वाटप

महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडून कासारे गावातील शेतकर्यांना कृषि साहित्याचे वाटप

राहुरी विद्यापीठ, दि. 29 मे, 2025 महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा स्मार्ट इरिगेशन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील कदम यांच्या देखरेखीखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद व कृषि अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असलेल्या कन्सोरशिया रिसर्च प्रोजेक्ट, आयओटी सक्षम व सेंसर आधारीत अद्ययावत सिंचन व्यवस्थापन प्रणाली प्रकल्पांतर्गत कृषि साहित्यवाटप कार्यक्रमाचे आयोजन मौजे कासारे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी स्मार्ट इरिगेशन प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. प्रमोद पोपळे, कासारे गावचे सरपंच श्री. शिवाजी निमसे, संशोधन सहयोगी डॉ. शुभांगी घाडगे, वरिष्ठ संशोधन सहकारी इंजि. शुभम सुपेकर आणि इंजि. गणेश उपस्थित होते. यावेळी स्मार्ट इरिगेशन प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेच्या माध्यमातून कासारे गावातील 19 शेतकर्यांना कृषि साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये कृषि अवजारे, जैविक खते, जैविक औषधे व कृषिदर्शनी-2025 या साहित्याचा समावेश होता. याप्रसंगी डॉ. प्रमोद पोपळे यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देऊन शेतीसाठी उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. यावेळी त्यांनी भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार्या विविध पद्धतींची आणि मृदा व जलसंधारण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत श्री. शिवाजी निमसे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!