राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
दैनिक राहुरी दर्पण
अहिल्यानगर : जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशिय सामाजिक संस्था केडगाव (देवी), अहिल्यानगर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींचा राष्ट्रीय /राज्यस्तरीय सत्कार / पुरस्कार समारंभ करण्याचे आयोजित केलेले आहे. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आदर्शमाता, आदर्श पत्रकार, बांधवानी आपले प्रस्ताव साध्या कागदावर, योग्य त्या माहितीसह (आपल्या कामकाजानुसार) संस्थेचे अध्यक्ष श्री. कांतीलाल जाडकर, रो-बंगला नं.१, (पाण्याच्या टाकी जवळ) ओंकार नगर, केडगाव (देवी) अहिल्यानगर. या पत्त्यावर मंगळवार दि. २७ मे २०२५ पर्यंत पाठवावेत अधिक माहितीसाठी आपण संस्थेचे अध्यक्ष श्री. कांतीलाल जाडकर यांच्याशी पुढे दिलेल्या मो. ८८०५९२२९६० नंबर वर संपर्क करुन माहिती घेऊ शकता.
टिप : पुरस्काराचे स्वरुप – मानाचा फेटा, सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. कार्यक्रमाचे स्थळ व वेळ नंतर कळविण्यात येईल.