वाहन विक्रेत्यांनी दुचाकी खरेदीदारास हेल्मेट पुरवावे
दैनिक राहुरी दर्पण
अहिल्यानगर, दि. १९- दुचाकी वाहन विक्रेत्यांनी दुचाकी विक्रीवेळी खरेदीदारास दोन हेल्मेट पुरविण्याच्या परिवहन विभागाने सूचना दिल्या असून वाहन नोंदणीसाठी कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये दुचाकीसोबत दोन हेल्मेट पुरविल्याबाबत पुरावा सादर करण्याच्या सूचनाही वाहन वितरकांना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे वाहन विक्रेत्यांनी तंतोतंत पालन करावे. सूचनांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास मोटार वाहन नियम क्र. १९८९ च्या नियम १३८ उपनियम ४ (फ) नूसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहिल्यानगर यांनी कळविले आहे.