महाराष्ट्र राज्य समाज कल्याण न्यासच्या प्रदेशाध्यक्षपदी मा. आ. रुपेश म्हात्रे तर प्रदेश उपाध्यक्षपदी राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे

महाराष्ट्र राज्य समाज कल्याण न्यासच्या प्रदेशाध्यक्षपदी मा.आ. रुपेश म्हात्रे तर प्रदेश उपाध्यक्षपदी राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे

दैनिक राहुरी दर्पण / मधुकर केदार

शिर्डी : महाराष्ट्र राज्य समाज कल्याण न्यास या संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची तर प्रदेश उपाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांची निवड करण्यात आली. शिर्डी येथे समाज कल्याण न्यास संस्थेची 24 वार्षिक सर्वसाधारण सभा व पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी हास्य प्रबोधनकार संस्थेचे प्रवक्ते संजीवन म्हात्रे होते. तर व्यासपीठावर समाज कल्याण न्यास या संस्थेचे संस्थापक थोर धर्मसेवक डॉ. सोन्या पाटील यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी स्वप्निल भोईर, प्रदेश संपर्कप्रमुख योगेश बेनके, प्रदेश प्रवक्ता संजीवन म्हात्रे, प्रदेश कार्याध्यक्ष नारायण मामा पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ.किशोर बळीराम पाटील, प्रदेश अध्यक्ष शिक्षक सेना सुधीर जावळे, उत्तर म. सचिव संजय फुलसुंदर, उत्तर म. प्रदेश संपर्कप्रमुख डाॅ.मनिलाल रतिलाल शिंपी, प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष शंकर खारीक, ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, ठाणे जिल्हा सचिव विलास भोईर, पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवळीकर, नाशिक जिल्हा अध्यक्ष मूलचंद भगत, कार्याध्यक्ष अजित गायधनी, बीड जिल्हा अध्यक्ष फारुख भाई शेख, धुळे जिल्हा अध्यक्ष समाधान पाटील, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा नलिनी चौधरी, नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ गायत्री महिंद्र पगार, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र बळीराम काबाडी, ठाणे महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अॅड शुभांगी ताई निचिते, भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष सौ स्वाती कांबळे, पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवळीकर, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ नलिनीताई घरत, पालघर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ अंजलीताई चौधरी आदींची राज्यातील जम्बो कार्यकारणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.

भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश म्हात्रे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या निवडीने नक्कीच नवचैतन्य प्राप्त झाली असून अनेक वर्षांपासून त्यांनी या संस्थेचे कामकाज पाहिले. समाज कल्याण या संस्थेचे संस्थापक धर्मसेवक सोन्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने उत्तर देताना हार तुरे हे अनाठाई खर्चाला फाटा देऊन सर्वांनी पेन, वही जरी विद्यार्थ्याला देऊन वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येकाने माझ्याकडे येण्यापेक्षा आपल्या मतदारसंघांमध्ये सामाजिक उपक्रम घेऊन गोरगरिबांना जेवण साहित्य वितरण करण्याचा संकल्प करा. असे सांगितले आभार प्रदर्शन या संस्थेचे प्रवर्तक जे. के.पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!