इयत्ता ५ वी च्या वर्गात नव्याने आलेल्या नवगतांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत

इयत्ता ५ वी च्या वर्गात नव्याने आलेल्या नवगतांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत

जिल्हा प्रतिनिधी / मधुकर केदार

शेवगाव : १६ जून २०२५, श्री गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाने बु. विद्यालयात इयत्ता ५ वी च्या वर्गात नव्याने आलेल्या नवगतांचे विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य श्री. रमेश लांडे सर व ह. भ. प. गणेश महाराज नवले (कृष्णाई वारकरी गुरुकुल आव्हाने बु .) यांच्या हस्ते एक वही, पेन व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी लाभलेले ह. भ. प. नवले महाराज यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य श्री. रमेश लांडे सर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जाधव के. के. यांनी केले तर अध्यक्षीय सूचना श्री. कोळगे सर यांनी दिली तर या सूचनेला अनुमोदन श्री झाडे सर यांनी दिले. विद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या भाषणातून नवीन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. ह. भ.प. नवले महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपली संस्कृती, आपले गुरू, आईवडील यांचा आदर करा आणि चांगल्या सवयी, चांगला अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हा. महाराजांनी शाळा व शाळेच्या परिसरांबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार श्री. संदीप बोरूडे सर यांनी मांडले या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!