शेवगाव तालुक्याचे भूमिपुत्र प्रा. अशोक ढोले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
दैनिक राहुरी दर्पण: मधुकर केदार
शेवगाव: शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघातर्फे दिला जाणारा पुणे जिल्हा हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार श्री.सत्यजित तांबे यांच्या हस्ते प्रा.अशोक ढोले यांना प्रदान करण्यात आला.या प्रसंगी श्री. साहेबरावजी घाडगे पाटील (माजी उपायुक्त मनपा मुंबई, संस्थापक अध्यक्ष त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान) श्री.मिलिंदजी कांबळे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ) डॉ.नेहा बोरसे (अध्यक्ष पुणे विभाग आदि मान्यवर उपस्थित होते) प्रा. अशोक सोपान ढोले हे श्री.गजानन माध्य व उच्च माध्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.ते सध्या पुण्यातील सिंबायोसिस कॉलेज ऑफ ऑटर्स ॲण्ड कॉमर्स या नामाकिंत महाविद्यालया मध्ये गेल्या 20 वर्षापासून अध्यापनाचे पवित्र कार्य करत आहेत.त्यांचा विद्यालयाचा वतीने सन्मान करण्यात आला यावेळी बोलतांना प्रा.ढोले सरांनी विद्यालयातील व जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला . त्यांनी बोलतांना प्राचार्य लांडे सर यांच्या प्रेरणेमुळे शिक्षण पुर्ण होण्यास मदत झाली.त्यांनी विद्यालयाचे ऋण व्यक्त केले वआपल्या आईच्या स्मरणार्थ दहावी व बारावी यशस्वी विद्यार्थ्यांना ट्राफी व रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला .
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य लांडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा.अशोक ढोले सुभाष नेव्हल अशा अनेक गुणी विद्यार्थी या विद्यालयाने घडविले व या परिसराला दिशा देण्याचे काम केले .
या सन्मानाच्या वेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.रमेश लांडे सर प्रा . सच्चिदानंद कर्डिले,प्रा.योगेश नरवडे प्रा.संदिप बोरुडे,श्रीमती कल्पना निकाळजे संभाजी मामा कळमकर,राजू चव्हाण आदि उपस्थित होते.