प्रहार दिव्यांग संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे यांना गरुड झेप फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर
राहुरी – प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांनी 2014 पासून शहराध्यक्ष पदापासून तालुकाध्यक्ष पदापर्यंत दिव्यांगासाठी नगरपालिका 5 % टक्के निधी मिळवून देणे, दिव्यांग रेल्वे पास, जयपुर फोर्ट, युनिट कार्ड,संजय गांधी निराधार योजना, शिबिराच्या माध्यमातून माणुसकीची भिंत, चला चुल पेटूया दिव्यांची, दिव्यांगाना व्यवसाय, दिव्यांगना चला घर बांधूया अशा अनेक उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना तालुक्यातील लाभ मिळून देण्याचे काम केले दिव्यांग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल गरुडझेप फाउंडेशनच्या वतीने 2025 चा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्याबद्दल अहिल्यानगर उत्तर जिल्हाअध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे,तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी, जुबेर मुसानी, जालिंदर भोसले,विजय म्हसे, सतीश तरवडे,संजय देवरे, जालिंदर हिवाळे, बाळासाहेब गांडाळ , शिवाजी जाधव पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.