मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्या विरोधात राहुरी पोलीसात तक्रार दाखल
राहुरी (दैनिक राहुरी दर्पण) – दि. 15 मे, 2025 राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत महा युतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांनी दिले होते. त्यावर विश्वास ठेवून राज्यातील शेतकऱ्यांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मते दिली, तरी सरकार स्थापन झाल्या नंतर या राजकीय मंडळींना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विसर पडला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांचे वर गुन्हे दाखल करा यांनी कर्जमुक्तीचे जाहीरनाम्यात आमिष दाखवत शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमुक्तीची शेतकऱ्यांची फसवणूक केली, अशी तक्रार शेतकरी संघटनेचे राहुरी तालुका युवा आघाडी अध्यक्ष अमोल मोढे यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे पी आय संजय ठेंगे साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली.
यावेळी अविनाश शेळके, वसंत शेटे, श्रीकांत दळे, अनिकेत पोटे, अशितोष मोरे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या वर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा. याबाबत पोलिस प्रशासनाने भूमिका न घेतल्यास आपण उच्च न्यायालयाच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ अजित दादा काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फिर्याद दाखल करण्याकमी न्यायालयात दाद मागणार आहोत. तशी तक्रार एस पी कार्यालय अहिल्यानगर जिल्हा येथे करणार आहोत.

कारण शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारभूत किंमत मिळत नाही. राज्य शासनाने सत्तेत येण्या आधी उत्पादन खर्च अधिक 20 टक्के नफा देऊ अशी घोषणा केली. तरी अशी कुठली ही हाल चाल शासनाकडून दिसत नाही. राज्यात 2024 मध्ये दर दिवसी 8 ते 9 शेतकरी आत्महत्या करत होते. आता त्यात 2025 मध्ये 32% वाढ झाली आहे. निवडणुकीच्या काळात शेती धंदा तोटयात असल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. तक्रार अर्जामध्ये मोढे यांनी म्हटले आमच्या कुटुंबाचा पिढ्यानपिढ्या पासून शेती हाच व्यवसाय आहे. शेतीत आम्ही ऊस, कांदा व कापूस हंगामी पिके घेतो मात्र गेल्या काही वर्षांपासून नेसर्गिक अपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ तसेच वन्यप्रान्यामुळे शेतीतील पिकांचे होणारे नुकसान व सरकारचे शेतकरी विरोधी धोरणामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र अशा परिस्थितीत आमच्या कडील सहकारी सोसायट्याचे कर्ज थकीत गेले आहे.
उदर निर्वाह करण्यासाठी आधीच अर्धिक अडचण असताना या कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाले आहे. संस्थेने थकित कर्जावर सुमारे साडे अकरा टक्के व्याजाची आकारणी केल्याने आम्ही अडचणीत आलो आहे. कोरोना काळात चार वर्ष शेतीमाल हा कवडीमोल भाव विकला आणि आता देखील शेतीमाल हवा तेवढा भाव मिळत नाही. यामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत आलो आहे म्हणून शेतकरी कर्ज भरू शकत नाही.